रत्नागिरी : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून ‘एकता तिरंगा रॅली’ काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील स्वत: राष्ट्रध्वज हातात घेऊन सहभागी झाले हाेते. पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी दुचाकीवर जिल्हाधिकारी यांचे सारथ्य केले.शासनाच्या आदेशानुसार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या १०० फुटी स्तंभावरील ध्वजाराेहणाने झाली. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी जमलेल्या रत्नागिरीकरांनी जयघाेष केला.त्यानंतर याच ठिकाणावरुन दुचाकी, चारचाकी व रिक्षा यांची एकता तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला व ते स्वत: या रॅलीत सामील झाले हाेते. त्यांचे दुचाकीवरील सारथ्य पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.या रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल, हेल्पिंग हॅन्डस, रत्नागिरी पत्रकार परिषद, व्यापारी संघटना, श्री रत्नागिरीचा राजा मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले. रॅलीत रत्नागिरी ऑटोमोबाईल संघटना, कृषी विभाग, नगरपालिका यांचे चित्ररथही होते.
... अन् पाेलीस अधीक्षक झाले जिल्हाधिकाऱ्यांचे सारथी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 2:42 PM