शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

‘निवडणूक अश्व’च दुबळे!

By admin | Published: November 16, 2016 12:18 AM

नोटा बंदचा परिणाम : निवडणुकीसाठी सज्ज ठेवलेले ‘काळे धन’ आता बिनकामाचे

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्या आणि निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे अवसानच गळून पडले. निवडणुकीसाठी आधीच मोठ्या प्रमाणात सज्ज ठेवलेले लाखोंचे धन या एका निर्णयाने निरुपयोगी झाले. परिणामी कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना रसद पुरवता न आल्याने उमेदवारांची पर्यायाने राजकीय पक्षांची शक्ती दुबळी झाली आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण व खेड या चार नगर परिषदा तसेच दापोली नगरपंचायतीची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सुरू केली होती. अलिकडच्या काळात निवडणुकांमध्ये घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होतो. उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालण्यात आलेली असली, तरी प्रत्यक्षात निवडणुकीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाचे प्रमाण मात्र व्यस्त आहे. निवडणूक काळात राजकीय क्षेत्रात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. निवडणुकीत काळ्या धनाचाही वापर होतो, अशी चर्चा नेहमीच होते. या पैशाच्या जोरावरच आजवर निवडणुका जिंकल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये पैशाचा ‘जोर’ अधिक असतो. २७ नोव्हेंबरच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ८ नोव्हेंबरला राजकीय नेत्यांची, उमेदवारांची झोप मोदी सरकारने उडवली. हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यामुळे राजकीय कारणासाठी सज्ज ठेवलेल्या धनाच्या साठ्याची किंमत शून्य झाली. कार्यकर्त्यांनीही हे जुने धन नाकारले. नवीन नोटा हाती येईपर्यंत बराच वेळ जाणार आहे. तसेच पांढऱ्या स्वरुपातील पैसा कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना वाटायचा म्हटले तरी बॅँकांमधून मिळणाऱ्या नोटांचे प्रमाण कमी असल्याने ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी व चिपळूण या जिल्ह्यातील दोन मोठ्या नगर परिषदा आहेत. तसेच येथील निवडणूकही सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. पाच वर्षांपूर्वीही या दोन नगर परिषदांच्या निवडणुकीत जोरदार राजकारण झाले होते व ‘काँटे की टक्कर’ही झाली होती. यावेळीही या दोन्ही नगर परिषदांवर वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात घोडेबाजार होणार, याची चर्चाही सुरू होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नोटा बंद करण्याच्या दणक्यामुळे ‘घोडेबाजारा’त गुंतवायचे काय, असा प्रश्न उमेदवारांपुढे उभा ठाकला आहे. उमेदवारांबरोबर कार्यकर्ते कमी नोटा बंदचा निर्णय होण्याआधी काही ठिकाणी धनपूर्ती झाल्याची चर्चा आहे. मात्र, निर्णयानंतर प्रचारकार्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास कार्यकर्त्यांनी नकार दिल्याने नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची गर्दी कमी झाली आहे. उमेदवार व चार-पाच कार्यकर्ते असे केविलवाणे चित्र नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात पाहावे लागत असल्याने मतदारांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.