रत्नागिरी: गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व इमारतींची वीज बिले व्यावसायिक दराऐवजी घरगुती दराने देण्याचा निर्णय वीज नियामक आयोगाने घेतला आहे. मार्च २०१८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने त्यांना आकारण्यात येणारे वीज बिल घरगुती दराने आकारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायती यांना व्यावसायिक दराने वीज बिले आकारण्यात येत होती. त्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारी ही बिले न भरल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात येत होता. यावरुन अनेकदा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी होत होती.
जिल्हा परिषदेच्या शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 4:27 AM