रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये, जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते. डिझेलवर धावणाऱ्या इंजिनच्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विद्युतीकरणाची यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता रत्नागिरी ते पुढे गोवा ठोकूरपर्यंत रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरण केले जाणार आहे. हे काम येत्या जूनपर्यंत मार्गी लावण्याचे प्रयत्न कोकण रेल्वेकडून सुरू असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्ग दुपदरीकरणावरही कार्यवाही सुरू आहे. तसेच चिपळूण-कऱ्हाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत अजूनही शासनस्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी खेडदरम्यानच्या मार्गावर रो-रो मधून ट्रक कोसळून अपघाताचा प्रकार घडला होता. हा अपघात ट्रक रो-रो वर व्यवस्थित लोडिंग न झाल्यामुळे घडल्याचे चौकशीतून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.डिंगणी - जयगड मार्गाचे काम रखडलेकोकण रेल्वे मार्गावरून जयगड येथे जिंदल कंपनीसाठी डिंगणी ते जयगड अशा रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सुमारे १० किलोमीटर इतके रेल्वेमार्गाचे अंतर प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, जेएसडब्ल्यू कंपनी सध्या तोट्यात असल्याने या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम रखडल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.पॅसेंजर रेल्वेचा निर्णय केंद्रांकडेलॉकडाऊन काळात कोकण रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. अनेक पॅसेंजर गाड्या आजही बंद आहेत. या गाड्या सुरू होण्यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार : संजय गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:48 AM
Konkan Railway Ratnagiri-कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.
ठळक मुद्दे सीआरएसच्या पाहणीनंतर गाड्या धावणार विजेवर, इंधन खर्चात बचत होण्यास मदत रोहा ते रत्नागिरी मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण