रत्नागिरी : शहरातील जयस्तंभ परिसरात जिल्हाधिकारी कमानीच्या बाहेर डीपीवर विद्युत प्रवाह खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी चढलेला महावितरणचा कर्मचारी विद्युत प्रवाह सुरू झाल्याने चिकटून गंभीर जखमी झाला. सुभाष पुंडलिक भोंगले (४०) असे त्याचे नाव असून, ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्याने घडली.हा प्रकार लक्षात आल्यावर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषद अग्निशामक दलाला याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी नगरपरिषदेचा अग्निशामक दल तसेच रुग्णवाहिका दाखल झाली. हा कर्मचारी खांबावर अडकून राहिल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.या कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी अग्निशामक दल व अन्य महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन जेसीबी व सिडीच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आले. या कर्मचाऱ्याला गंभीर अवस्थेत तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हा कर्मचारी काम करण्यासाठी वीज खांबावर चढला असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
विजेचा शॉक लागून कर्मचारी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 2:39 PM
mahavitran, ratnagiri, shock, accident रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरात जिल्हाधिकारी कमानीच्या बाहेर डीपीवर विद्युत प्रवाह खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी चढलेला महावितरणचा कर्मचारी विद्युत प्रवाह सुरू झाल्याने चिकटून गंभीर जखमी झाला. सुभाष पुंडलिक भोंगले (४०) असे त्याचे नाव असून, ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या दरम्याने घडली.
ठळक मुद्देविजेचा शॉक लागून कर्मचारी गंभीर जखमीविद्युत प्रवाह सुरू झाल्याने चिकटून जखमी