शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नोकरीच्या संधी उपलब्ध : मापुस्कर

By admin | Published: November 27, 2014 10:47 PM

मार्गताम्हाणे महाविद्यालय : विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेबाबत माहितीची अपेक्षा

चिपळूण : पदवीधर विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय व नोकरीच्या संधी भविष्यकाळात उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे विचार करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांनी व्यक्त केले. डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हाणे येथे करिअर गाईडन्स विभागाच्या मार्गदर्शक व्याख्यानप्रसंगी मापुस्कर बोलत होते. व्याख्यानाचे प्रास्ताविक व व्याख्यात्यांची ओळख प्रा. विकास मेहेंदळे यांनी करून दिली. आपल्या जीवनात कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यास नेहमी सराव, मार्गदर्शन यांच्याबरोबर आत्मविश्वास आवश्यक आहे. आपली आवड, व्यवसायाचा कल, स्वरुप यांचा अभ्यास केला पाहिजे, असे मापुस्कर यांनी सांगितले. सामान्यज्ञानाच्या वाढीसाठी दैनंदिन स्वरुपामध्ये वृत्तपत्रांचे वाचन करणे, रेडिओ व दूरदर्शनवरील बातम्या ऐकणे याची सवय केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोकण विभागाशी संबंधित असणाऱ्या शेतीपूरक उद्योग, फळप्रक्रिया उद्योग, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन यांच्यामध्ये भविष्यकाळात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयाने पुरवलेल्या सुविधा, मार्गदर्शनासाठी घेतले जाणारे कार्यक्रम यांचा उपयोग करुन आपले भवितव्य उज्वल करावे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. प्राचार्य विजयकुमार खोत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. संगीता काटकर, प्रा. माने, प्रा. रावळ अन्य शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)