रत्नागिरी : मिऱ्या - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत साळवीस्टॉपासून पुढे मिरजोळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारी अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईतून हटविण्यात आली. ही कारवाई शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. मिऱ्या - नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.मिऱ्या - नागपूर महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याने रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ही अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांनी संबंधितांना नोटीस काढल्या. या कारवाईला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे.तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून एकाच दिवसात ६५ अतिक्रमणे हटविण्यात आली. महामार्गालगतच्या टपऱ्या, गाड्या धुण्याचे रॅम्प, विविध वस्तुंची विक्री करणारी दुकाने, चिकनची दुकाने हटविण्यात आली. काही दुकानदारांनी स्वत:च आपली दुकाने हटविली होती. तसेच काही दुकानांचे फलक महामार्गानजीक लावण्यात आले होते. हे फलकही हटविण्यात आले.शुक्रवारपासून दोन दिवसांची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून, शनिवारी उर्वरित अतिक्रमणे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. ही अतिक्रमण हटाव मोहीम महसूलच्या नायब तहसीलदार माधवी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाडगावचे तलाठी अरविंद शिंदे, ए. ए. भगत, तहसील कार्यालयातील महसूल सहायक अमोल कांबळे, रविकांत खाके, अव्वल कारकून नारायण चौधर, मिरजोळे तलाठी संकेत घाग आदींकडून सुरू आहे.
रत्नागिरीत महामार्गावरील अतिक्रमणे अखेर हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:38 PM
Ratnagiri Nagar Parishad-मिऱ्या - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत साळवीस्टॉपासून पुढे मिरजोळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारी अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईतून हटविण्यात आली. ही कारवाई शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. मिऱ्या - नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ठळक मुद्देमिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम