रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील भारतातील सर्वात मोठ्या लांबीच्या करबुडे बोगद्यात कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. गाडीत कोणीतरी स्मोकिंग केल्यामुळे हा प्रकार झाल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने वर्तविला. दरम्यान, यामुळे गाडीतील ५ प्रवाशांना दम्याचा त्रास जाणवल्याने त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले.कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी घडली. या मार्गावरील करबुडे बोगद्यातच ही गाडी जवळजवळ पाऊण तास थांबली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. बोगद्यात गाडी थांबल्याने प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुसरे इंजिन मागवून गाडी संगमेश्वर स्थानकात नेण्यात आली.गाडीतील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने आरोग्य यंत्रणाही तैनात केली होती. यादरम्याने गाडीतील ५ प्रवाशांना दम्याचा त्रास जाणवू लागल्याने आरोग्य यंत्रणेकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:57 PM
कोकण रेल्वे मार्गावरील भारतातील सर्वात मोठ्या लांबीच्या करबुडे बोगद्यात कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. गाडीत कोणीतरी स्मोकिंग केल्यामुळे हा प्रकार झाल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने वर्तविला. दरम्यान, यामुळे गाडीतील ५ प्रवाशांना दम्याचा त्रास जाणवल्याने त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले.
ठळक मुद्देकोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड ५ प्रवाशांना दम्याचा त्रास