शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; दोन तासांनी गाडी रवाना, प्रवाशांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 2:29 PM

मुंबईहून मडगावकडे येण्यासाठी निघालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

रत्नागिरी : मुंबईहून मडगावकडे येण्यासाठी निघालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. तब्बल दोन तास ही गाडी वीर स्थानकावर उभी करुन ठेवण्यात आली होती. दुसरे इंजिन जोडल्यानंतर १२.५० वाजता ही गाडी मडगावकडे येण्यासाठी निघाली.कोकण रेल्वे मार्गावरील १०१०३ मुंबई - मडगाव मांडवी एक्स्प्रेस गाडी सकाळी मुंबईतून सुटल्यानंतर सकाळी १०.४० वाजता वीर स्थानकावर पोहोचली. या स्थानकावर आल्यावर गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे बराच वेळ ही गाडी तेथेच उभी करुन ठेवण्यात आली होती. मात्र, नेमके काय झाले आहे हे प्रवाशांना कळत नव्हते. दीड तासांनी गाडीतील फेरीवाल्याने प्रवाशांना गाडीचे इंजिन बिघडल्याची माहिती सांगितल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.त्यानंतर इंजिन दुरुस्ती काम हाती घेण्यात आले. मात्र, इंजिन दुरुस्त न झाल्याने चिपळूण स्थानकावरुन दुसरे इंजिन मागविण्यात आले. हे इंजिन आल्यानंतर तब्बल २ तासांनी १२.५० वाजता गाडी मडगावकडे रवाना झाली.मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन सुटणारी मांडवी एक्स्प्रेस कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या अनेक प्रवाशांच्या सोयीची गाडी आहे. परंतु, ही गाडी नेहमीच पॅसेंजर गाडीप्रमाणे रखडत जात असल्याचा अनुभव येत आहे. ही गाडी कधीही वेळेत पोहोचत नसल्याने आधीच प्रवाशामंध्ये नाराजी आहे; त्यात आज इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या गाडीचे वेळापत्रकच कोलमडले आहे.  हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोणतीही उद्घोषणा करुन प्रवाशांना सूचना न दिल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेpassengerप्रवासी