शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

Ratnagiri: राजापूरसाठी स्थलांतर हाच पर्याय?, गेल्या दोन महिन्यांत शहराला पाच वेळा पुराच्या पाण्याचा वेढा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:27 PM

विनाेद पवार राजा पूर : पावसाळा सुरू झाला की, राजापुरात पूर येताेच हे आता नित्याचे झाले आहे. पुराचे पाणी ...

विनाेद पवारराजापूर : पावसाळा सुरू झाला की, राजापुरातपूर येताेच हे आता नित्याचे झाले आहे. पुराचे पाणी शहरात शिरून दरवर्षी किमान सात ते आठ वेळा बाजारपेठ ठप्प होते. मात्र, या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून किमान पाच वेळा पुराच्या पाण्याने राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. गाळ उपसा केल्यानंतरही राजापूरची पूर समस्या कायम आहे. त्यातच शासनाच्या पाटबंधारे विभागाने दोन वर्षांपूर्वी शहराच्या पूररेषेत वाढ केल्याने आता या पूररेषामुक्तीतून व पूरमुक्तीतून सुटका होण्यासाठी संपूर्ण राजापूर शहराचे स्थलांतर हा एकमेव पर्याय ठरणार आहे.

साधारणत: १८७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्यानंतर राजापूर बंदरात येणारी जहाजे येणे बंद झाले व राजापूरच्या वैभवाला उतरती कळा लागली. तेव्हापासून राजापूर आणि पूर हे समीकरण बनत गेले आहे ते आजतागायत तसेच आहे. मात्र, १९८३ साली आलेल्या महापुराने राजापूर शहर जलमय झाले व शासनाने राजापूर शहरात पूररेषा अस्तित्वात आणली. शासनाने लागू केलेली पूररेषा राजापूर नगर परिषदेने १९९३ साली स्वीकारल्यानंतर शहरातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन शहराजवळील कोदवली ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आले. मात्र, हे पुनर्वसन पूर्णत: अयशस्वी ठरले आहे.गतवर्षी राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवलीसह अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा झाल्यानंतर पुराची तीव्रता कमी होईल, असे वाटत हाेते. गेल्या दोन महिन्यांच्या काळात राजापूर शहरात आजपर्यंत पाच वेळा पुराचे पाणी शिरून शहरवासीयांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अद्यापही अजून अर्धा पावसाळा बाकी आहे. या वर्षी सर्वाधिक पूर हा जुलै महिन्यात आला असून, या महिन्यात चार वेळा पुराने राजापूर शहराला वेढा दिला आहे.

पावसाचा जोर वाढला की काेदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ हाेते आणि पुराचे पाणी शहरात शिरते. शहरात पाणी शिरले की शहरवासीयांना व्यापाराबरोबर अन्य वैयक्तिक नुकसानाला सामोरे जावे लागते. शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था व जनजीवन पुरामुळे विस्कळीत होते. त्यामुळे या पूरसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीची पूर्तता न केल्याने अजूनही राजापूरकरांच्या डाेक्यावर पुराची टांगती तलवार कायम आहे. पुराच्या धाेक्यातून राजापूरकरांची सुटका कधी हाेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाढता धाेकापावसाचा जाेर वाढताच अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेते. जुलै महिन्यात पाच वेळा नदीचे पाणी शहरात शिरले हाेते. शनिवारी (२७ राेजी) अर्जुना नदीची पाणी पातळी ५.४० मीटरपर्यंत पाेहाेचली हाेती. इशारा पातळीच्या वर पाणी पातळी पाेहाेचल्याने शहरातील जवाहर चाैकात पाणी आले हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfloodपूर