रत्नागिरी: चालक नसलेली रिक्षा गोल गोल फिरताना कधी पाहिली आहे? आज रत्नागिरीकरांनी हे अनोखे दृश्य पाहिले. रत्नागिरीच्या जेल नाका येथे एक रिक्षा काहीवेळ चालकाविना गोल-गोल फिरत होती.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारा जेल नाका येथे एका रिक्षाचा अपघात होऊन चालक बाहेर फेकला गेला. मात्र त्याचवेळी रिक्षाचे हँडल लॉक झाले आणि रिक्षा गोलगोल फिरू लागली. आसपासच्या लोकांनी रिक्षा थांबवण्याचा बराच प्रयत्न केल्यानंतर अखेर रिक्षा अडवून धरण्यात आली आणि मग बंद करण्यात आली.