पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर झेंडू लागवड करायची, त्यांनी ठरवली. उष्ण व समशीतोष्ण हवामानात झेंडूचे पीक दर्जेदार येते. त्यासाठी त्यांनी आफ्रिकन, फ्रेंच संकरीत लागवड करण्याचा निर्णय घेतला. लागवडीपूर्व व लागवडीनंतर खतव्यवस्थापन, पाण्याची मात्रा, कीटकनाशक फवारणी ते फुलांच्या काढणीपर्यंत तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषी पर्यवेक्षक एल.जे. मांडवकर, कृषी सहायकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.
भाताऐवजी झेंडू शेती
भातशेती खर्चिक झाल्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली झेंडू लागवड केली आहे. रोपाची निवडीपासून काढणीपर्यंत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे भरघोस उत्पन्न मिळाले. भातशेतीपेक्षा उत्पन्न दुप्पट तर मिळालेच, मनुष्यबळही फारसे लागले नाही. स्थानिक बाजारपेठेतच झेंडूची चांगली विक्री झाल्याने फायदा झाल्याचे शशांक यांनी सांगितले.
पावसाळ्यात लागवड
शशांक यांनी पावसाळ्यात लागवड केली. लागवड केल्यापासून ६० ते ६५ दिवसांत फुले काढणीसाठी तयार झाली. गणेशोत्सवापासून, दसरा, दीपावलीत झेंडू टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आला. संध्याकाळी काढणी करून सकाळी बाजारात पाठविण्यात येत होती. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला, तर नक्कीच याचा फायदा होता. उत्पादन भरघोस प्राप्त होते.