खेड : कोकण मार्गावर रेल्वे गाड्यातील गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी
कोईमतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल गाडीला ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा
निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष कारोनाबाधित
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव व त्यांची पत्नी या दोघांना
कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कातील आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन विक्रांत जाधव यांनी केले आहे.
संदेश झेपले यांचे यश
देवरूख : देवरूख शहरातील देवरूख नं ४ शाळेचे शिक्षक व पूर गावचे रहिवासी संदेश झेपले यांनी रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे. कास्ट्राइब शिक्षक संघटना रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये झेपले यांनी
शिक्षक गटात सहभाग घेतला होता.
आयसोलेशन सेंटरची मागणी
गणपतीपुळे : मालगुंड परिसरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन गणपतीपुळे देवस्थानच्या ताब्यातील भक्तनिवास इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर होण्याऐवजी होम आयसोलेशन सेंटर सुरू करावे. हे सेंटर सुरू करण्याची एकमुखी मागणी मालगुंड परिसरातील चार ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामकृती दलाच्या सदस्यांनी केली आहे.
गुहागरात शिधावाटप
गुहागर : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टतर्फे भंडारी भवनात ३० गरीब कुटुंबाना शिधा वाटप करण्यात आले. यावेळी मनप्रवाह ट्रस्टचे संस्थापक डॉ. सुकुमार
मुंजे, भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे, केशव केसरकर उपस्थित होते.
मोबाइल सेवा मिळावी
खेड : तालुक्यातील किंजळे तर्फे नातू, घोगरे, दहिवली, शिंगरी, पुरे या
गावांमध्ये अजूनही मोबाइल सेवेचा थांगपत्ताच नसल्याने ग्रामस्थांना मनस्ताप
करावा लागत आहे. या भागामध्ये मोबाइल नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जल फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी केली आहे.