रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येत असल्याने नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थिरावलेली मंडळी आवर्जून गावी परतात. मुंबईतून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्यांची उपलब्धता राज्य परिवहन रत्नागिरी विभागाने केली आहे. मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी ५० तर जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी ५४ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.कोकणात गणेशोत्सव व शिमगोत्सव मोठ्या उत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभागातून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. त्याप्रमाणे शिमगोत्सवासाठीही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणात तेरसे व भद्रे शिमगे साजरे करण्यात येतात. रविवार दि. २४ मार्च रोजी होळी तर दि.२५ रोजी धुलिवंदन आहे. याला भद्रे शिमगे म्हटले जातात तर या शिमग्याच्या दोन दिवस आधी तेरसे शिमगे साजरे होतात. त्यामुळे दि. २० मार्चपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. रत्नागिरी विभागातील नऊ आगारात जादा गाड्या येणार आहेत, त्याप्रमाणे परतीसाठीही जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिमगोत्सवासाठी रत्नागिरी विभागातून जादा गाड्या
By मेहरून नाकाडे | Published: March 16, 2024 3:12 PM