शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वणवे रोखण्यात अपयश

By admin | Published: February 12, 2015 11:53 PM

कायद्याची गरज : नैसर्गिक साखळी येतेय धोक्यात

फुणगूस : जिल्ह्यातील बहुतांश वणवे जानेवारी ते मे या काळात लागतात. या वणव्यात आंबा आणि काजूच्या बागा बेचिराख होतात. यातील बरेचसे वणवे मानवनिर्मित असतात. वणव्याचे वाढते प्रमाण पाहता पर्यावरण संरक्षणासाठी वणवा निर्मूलनात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. जैवविविधतेने नटलेल्या भागात हजारो वनस्पती व प्राण्यांच्या जाती आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, अलिकडे डोंगर रांगांना वणव्यांचे गालबोट लागलेले दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी शेतजमिनीवरील गवत नाहिसे होऊन शेती चांगली पिकावी, यासाठी भाजावळ केली जायची. याच आगीचे काही वेळेला वणव्यात रुपांतर होते. भडकत गेलेली आग आंबा, काजूच्या बागांना गिळंकृ त करते. त्यामुळे नैसर्गिक साखळी धोक्यात येत आहे.वनक्षेत्रात वणवा लावणे, निष्काळजीपणामुळे लावलेली, लागलेली आग वनक्षेत्रात पसरणे, हा कायदेशीर गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. वणवे लावणाऱ्याविरोधात पूर्वी कायद्याने कोणती ना कोणती शिक्षा केली जात होती. मात्र, सध्या असे काही घडताना दिसत नाही.वणव्यामुळे रानटी जनावरांचे व प्राण्यांचे या सहा महिन्यांचे खाद्य नष्ट होते. त्यामुळे त्यांच्या पैदासीवर, अनिष्ट परिणाम होतो. वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल होतो. पशु-पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होतात. गवतावर भूक भागवणारी भेकर, ससे, हरीण आदी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्या बाजूला या प्राण्यांच्या जीवावर आपली भूक भागवणारे वाघ, कोल्हे, लांडगे यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांनी आपला मोर्चा भक्ष्यशोधार्थ मानवी वस्तीकडे वळविला असून, त्यांच्याकडून जनावरांची शिकार केली जात आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. या वणव्यामुळे कोकणात निर्माण होणाऱ्या कृषी पर्यटक व्यवसायालाही फटका बसत आहे.वणवा हा मुख्य मुद्दा ठरत आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने पर्यावरणप्रेमी तसेच संघटनांमार्फ त वनक्षेत्रात वणवा निर्मूलन मोहीम व वनसंरक्षण अभियानाला सुरुवात केल्यास भविष्यात ओढवणाऱ्या आपत्तींना वेळीच आळा घालता येईल, असे मत व्यक्त केले जात अ्हे. नजिकच्या काळात वणवे लावण्याचे प्रमाण कमी होईल व जंंगलाचे संरक्षण केले जाईल असे मत व्यक्त होत आहे. (वार्ताहर)लोकसहभाग महत्त्वाचा रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान जोरदार वणवे लागतात. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असून, वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक डोंगरावर असे प्रकार केले जात असून, शासन यंत्रणा गप्प का, असा सवाल विचारला जात आहे. शेतजमीन अथवा जैवविविधता असलेल्या डोंगरावर असे वणवे लावण्याचे प्रमाण मोठे आहे.