पावस : जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. या हल्ल्यात मेर्वी - जांभूळ भाटले येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चंदूरकर गंभीर जखमी झाले आहेत.मेर्वी जांभूळ भाटले येथील जनार्दन काशिनाथ चंदूरकर (५५) हे शनिवारी सकाळी जनावरे चरण्यासाठी बागेमध्ये घेऊन गेले होते. त्याचवेळी आंब्याच्या बागेमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. चंदूरकर यांच्या मानेवर आणि मांडीवर बिबट्याने जोरदार हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. मात्र, जीव वाचविण्यासाठी त्यांनी त्याच गंभीर अवस्थेमध्ये आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यांच्या ओरडण्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.चंदूरकर यांचा आरडाओरडा ऐकून बाजूच्या शेतांमध्ये भाजी काढण्यासाठी आलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या चंदूरकर यांना तत्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मेर्वीचे सरपंच शशिकांत म्हादये यांनी वनविभागाला दिली. ही माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल जी. पी. कांबळे, मिताली कुबल, एम. जी. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.बिबट्याचे पिल्लांसह दर्शनगेल्याच आठवड्यामध्ये या परिसरामध्ये मादी जातीचा बिबट्या तिच्या चार पिल्लांसह फिरताना दिसत होती. शनिवारी अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. या भागातील ग्रामस्थ घाबरून गेले आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मेर्वी येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 1:06 PM
जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. या हल्ल्यात मेर्वी - जांभूळ भाटले येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चंदूरकर गंभीर जखमी झाले आहेत.
ठळक मुद्देजखमी शेतकरी रुग्णालयात दाखल, आरडाओरड केल्याने बिबट्याने ठोकली धूमसुदैवाने बिबट्याच्या तावडीतून बचावले