शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:41 AM

शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

ठळक मुद्देअनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली ग्रामसेवकांच्या असहकार्य आंदोलनाचा परिणाम

रत्नागिरी : शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.फळबाग लागवड रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या प्रयत्नामुळे प्रारंभीच्या दोन वर्षात केवळ रत्नागिरीतच १० हजार हेक्टर पडीक क्षेत्रावर लागवड झाली होती.

२०१७ -१८ साली जिल्ह्यात नऊ पंचायत समित्यांच्या माध्यमातून १९३२.३० हेक्टर क्षेत्रावर, तर कृषी विभागाने ३०५१.३० अशी पाच हेक्टर हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली होती. सन २०१८ - १९ या वर्षातही पंचायत समिती आणि कृषी विभाग यांनी एकत्रित मिळून ५८९४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती.मात्र, २०१९-२० या वर्षात या योजनेच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी या योजनेला असहकार्य करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील फळबाग मोहिमेला खीळ बसली आहे. पंचायत समित्यांना दिलेले यावर्षीचे एकूण ८२६.४० हेक्टर आणि १३४३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले असून केवळ ३०१.२५ हेक्टर क्षेत्रावरच यावर्षी लागवड झाली असून, १३४३ लाभार्थ्यांपैकी केवळ ४०७ लाभार्थ्यांचेच उद्दिष्ट पुर्ण झाले आहे.यावर्षी ग्रामसेवकांनीच या राष्ट्रीय कामाला असहकार दर्शविल्याने जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या माध्यमातून केवळ ३० टक्केच काम झाले आहे. यावर्षी ३०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली. केवळ ४०७ शेतकऱ्यांना या योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत या सर्व शेतकऱ्यांना ३ कोटी ७१ लाख ३८ हजार रूपयांचेच वाटप झाले.कृषी सहाय्यकयावर्षी कृषी सहाय्यकांनीच हातभार लावत ही योजना पुढे नेली आहे. यावर्षी कृषी विभागाला ५४६९ हेक्टर क्षेत्र आणि ८११८ लाभार्थी एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३७८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड आणि ५९६६ लाभार्थ्यांना या योजनेच्या निधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचे कृषी विभागाने लाभार्थ्यांचे ७३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.धावून आले मदतीलादोन वर्षे अतिशय गती घेतलेल्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला यावर्षी खीळ बसल्याने सलग दोन वर्षे ९ हजारपेक्षा अधिक असलेल्या लाभार्थ्यांना २१ कोटीपेक्षा अधिक निधीचे वाटप झाले होते, यावर्षी केवळ ४०७ शेतकऱ्यांना ३ कोटी ७१ लाख एवढ्या निधीचा लाभ घेता आला. ग्रामसेवकांच्या असहकार्यामुळे फळबाग लागवडीला फटका बसला.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी