शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

कूळ वहिवाटीसाठी उपोषण

By admin | Published: April 05, 2016 12:40 AM

विष्णू आमरेंचा इशारा : तहसीलदारांकडून झालेली नोंद सातबाऱ्यावर नाही

 देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली येथील विष्णू धोंडू आमरे यांचे सातबारा दप्तरी कूळ वहिवाटदार म्हणून नाव लावले जाईल, असे आश्वासन देऊनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली येथील विष्णू धोंडू आमरे हे १० एप्रिलपासून उपोषणाला बसणार आहेत. एक महिना यासाठी शासनाला आमरे यांनी अवधी दिला होता. या दरम्यान त्यांचे साखळी उपोषण सुरूच होते. अंत्रवली येथील विष्णू धोंडू आमरे कुटुंबियांनी साखळी उपोषण फेब्रुवारी महिन्यात सुरू केले होते. सुरूवातीला शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर उपोषणाची तीव्रता वाढताच अखेर या उपोषणाची दखल घेत तहसीलदार वैशाली माने यांनी सातबारावर २ मार्च रोजी विष्णू आमरे यांच्या नावाची नोंद करून दिली होती. यामुळे आमरे यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र, साताबाऱ्यावर आजतागायत कूळ वहीवाटदार म्हणून नोंद करण्यात आलेली नाही. ही नोंद त्वरित न झाल्यास १५ मार्च रोजी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा आमरे यांनी दिला होता. या कालावधीतही प्रत्यक्षात कूळ वहिवाटदार म्हणून नोंद करण्यात आली नाही. आमरे यांचे वडील धोंडू राघो आमरे यांचे कुळवहीवाटदार म्हणून १९५६ सालापासून १९८० सालापर्यंत नाव होते. अचानक धोंडू राघो आमरे यांचे नाव न लावता इब्राहीम काका उपाध्ये जमीन कसतो असे दाखवून सन १९९१ ते १९९९पर्यंत इब्राहिम काका उपाध्ये असे नाव लावण्यात आले. इब्राहीम काका उपाध्ये हा इसम २४ जून १९७१ साली मयत असून, तो १९९१ पासून १९९९ पर्यंत जमीन कसण्यासाठी कसा आला याची चौकशी होऊन माहिती मिळावी, असे निवेदन आमरे यांनी तहसीलदारांना सादर केले होते. सन २००३ ते २०१५पर्यंत नायब तहसीलदार यांच्या आदेशाने कूळ वहीवाटदार म्हणून विष्णू धोंडू आमरे यांचे नाव लावण्यात आले. तरीही २० एप्रिल २०१५ रोजी सातबारा उतारा प्रत्यक्षात आमरे यांना का देण्यात आला नाही, याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सन २०१६च्या नेटवरील सातबारा उताऱ्यामध्ये विष्णू धोंडू आमरे यांचे नाव वगळण्यात आले. याबाबत आमरे कुटुंबियांना तहसीलदारांकडून न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी साखळी उपोषणाचा निर्णय घेतला. आमरे कुटुंबियांनी लोकशाही मार्गाने उपोषण केल्यानंतर तहसीलदार माने यांनी या उपोषणाची दखल घेत विष्णू आमरे यांना देवरूख तहसील कार्यालयात निमंत्रित केले. यावेळी आमरे यांच्याशी माने यांनी सखोल चर्चा केली. यानुसार सातबारा दप्तरी विष्णू आमरे यांच्या नावाची नोंद करून तसा सातबारा देण्यात आला. मात्र, या सातबाऱ्यात कूळ वहिवाटदार म्हणून आमरे यांची नोंद झालेली नाही. ही नोेंद १५ फे ब्रुवारीपूर्वी व्हावी, अशी मागणी आमरे यांनी तहसीलदारांकडे केली होती. यावेळी तहसीलदारांनी या नोंदीसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना आमरे यांना केल्या होत्या. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही आमरे यांच्या नावाची नोंद न झाल्याने अखेर १० एप्रिलपासून उपोषणाचा इशारा विष्णू आमरे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी) अनेक त्रुटी : आॅनलाईन सातबारा अद्ययावत नसल्याने गोंधळ शासनाने आॅनलाईन सातबारा देण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तलाठी कार्यालयात सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आॅनलाईन सातबाऱ्यात अनेक त्रुटी आहेत. सन २०१२ नंतर सातबारा अद्ययावत करण्यात आले नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यात अजून सुधारणाच झालेली नाही.