शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
2
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
3
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
4
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
5
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
6
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
7
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
8
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
9
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
10
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
11
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
12
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
13
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट
14
"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   
15
सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
16
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
17
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
18
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
19
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
20
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

Ratnagiri: नांदिवसे ग्रामस्थांचे देवस्थान ट्रस्टच्या विरोधात उपोषण

By संदीप बांद्रे | Published: October 02, 2023 6:04 PM

चिपळूण : श्री स्वयंभू शंकर देवस्थान ट्रस्ट स्वयंदेव नांदिवसे ट्रस्टच्या विरोधात स्थानिक प्रशासनासह सहायक धर्मादाय आयुक्तांना निवेदन देऊनही कोणती ...

चिपळूण : श्री स्वयंभू शंकर देवस्थान ट्रस्ट स्वयंदेव नांदिवसे ट्रस्टच्या विरोधात स्थानिक प्रशासनासह सहायक धर्मादाय आयुक्तांना निवेदन देऊनही कोणती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नांदिवसे, स्वयंदेव, राधानगरी ग्रामस्थांनी आज, सोमवारपासून येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.नांदिवसे येथील मंदिराची ट्रस्टने दुरावस्था केली आहे. २०१९ पासून मंदिर जीर्णोध्दार करण्याचे ट्रस्टने ठरवताना ग्रामस्थांना विश्वासात घेतलेले नाही. मंदिराचे काम सुरु केले असले तरी सद्यस्थितीत ते काम पूर्ण बंद आहे. त्यामुळे सहायक धर्मादाय आयुक्तांनी कोर्ट कमिशन किंवा त्रयस्थ समितीची नेमणूक करून या ट्रस्ट व मंदिराची वस्तूस्थितीची पाहणी करावी. तसेच स्वयंभू शंकर मंदिर देवस्थान ट्रस्ट रद्दबातल ठरवण्यात यावा व मंदिराचा ग्रामस्थांना पूर्वीप्रमाणे ताबा मिळावा, अशी मागणी उपाेषणकर्त्यांनी केली आहे.याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार, बैठका झाल्या असल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आठ दिवसांपूर्वी उपोषणाचे पत्र देऊनही काही न झाल्याने ग्रामस्थांनी उपाेषणाचा मार्ग पत्करला आहे. तहसीलदार प्रवीण लोकरे, प्रांत कार्यालयाचे प्रकाश सावंत यांनी सोमवारी सकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, उपोषणकर्त्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहत जोपर्यंत योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर जयवंत शिंदे, प्रकाश शिंदे, वसंत शिंदे, दिपक शिंदे, दत्ताराम शिंदे, शरद शिंदे, राजाराम शिंदे, भरत शिंदे, मधुकर शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रकाश कदम, संतोष पवार, सुनील शिंदे, सुनील पवार, रामराव शिंदे, महादेव शिंदे, विनोद शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलन