चिपळूण लायन्स क्लबतर्फे ग्राहक दिन
चिपळूण : लायन्स क्लबतर्फे खेर्डी येथील संजीवनी प्रशिक्षण संस्थेत जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. लायन्स क्लब अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्या संध्याराणी नांदगावकर, मयूरी शिगवण, निकिता झगडे, लायन्स क्लब सचिव जगदीश वाघुळदे उपस्थित होते.
खेड जेसीआय दिशाच्या अध्यक्षपदी नईमा राजपूरकर
खेड : जेसीआय दिशाच्या अध्यक्षपदी नईमा राजपूरकर यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ माजी आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी जेसीजचे अध्यक्ष पराग पाटणे, माजी विभागीय अध्यक्ष अमोल क्षीरसागर, विभागीय उपाध्यक्ष इशान उसापकर, जैसी आय दिशाच्या माजी अध्यक्षा पूजा आंबुर्ले, सुप्रिया भोसले उपस्थित होते.
पतंजली योग समितीचे ऑनलाईन शिबिर सुरू
दापोली : स्वामी रामदेवजी प्रणिशीत पतंजली महिला योग समिती (कोकण)तर्फे ५ वे ऑनलाईन योग शिबिर सुरू असून ते ५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. हे शिबिर पहाटे ५ ते ६.३० व दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० यावेळेत होणार आहे. या शिबिरामध्ये योग-प्राणायाम तसेच विविध आसने, जॉगिंग, सूर्यनमस्कार, ॲक्युप्रेशर, मुद्राचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले जात आहे.