२. कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना राजापूर तालुक्यात एकूण ५०,०६६ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यामध्ये १२,७८५ कोव्हॅक्सिन तर ३७,२८१ कोविशिल्ड डोसचा समावेश आहे. तालुक्यातील राजापूर शहर व रायपाटण या दोन ग्रामीण रुग्णालयांच्या जोडीला ओणी, करक-कारवली, जवळेथर, केळवली, फुफेरे, कुंभवडे, जैतापूर, सोलगाव, धारतळे अशा ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांच्या माध्यमातून लसीकरण झाले.
३. चिपळूण शहरालगतच्या कापसाळ येथे कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे आयोजन यापूर्वी करण्यात आले होते. ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार आरोग्य विभागामार्फत कोविशिल्डचा दुसरा डोस गावातील १०० ग्रामस्थांना देण्यात आला. यावेळी मानकरी शांताराम साळवी, सरपंच सुनील गोरिवले, उपसरपंच प्रकाश डिगे, माजी सरपंच वसंत कांबळी, दीपक मोरे, ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी, सचिन नाचणकर, श्रुती कांबळी उपस्थित होत्या.