२. जिल्ह्यातील सर्व मॅाल्सना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. माॅलमध्ये कार्यरत असलेले सवर्व व्यवस्थापन, कर्मचारी, प्रवेश करणाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत. दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र फोटोसह ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
३. मागणीनुसार कोव्हॅक्सिन, कोविशिल्डचे डोस उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील असंख्य नागरिक अद्यापही लसीकरणाच्या मोहिमेपासून वंचित राहिले आहेत. आपल्याला डाेस मिळणार की नाही याबाबत त्यांच्या मनात अद्यापही साशंकता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसमोर रांगा लावूनही लसीकरण केले जात नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. रांगेत असलेल्यांनाच डोस दिले जात नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.