२. राजापूर तालुक्यात गेले १५ दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परिणामी धारतळे कोविड सेंटरमध्ये एकही सक्रिय रुग्ण राहिलेला नाही. धारतळे येथे रुग्ण नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते सेंटर बंद करण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सव सणात होणारी गर्दी आणि तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे सुयोग्य नियोजन करून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.
३. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी रुग्ण कमी ठेवण्याचे काम मंडणगड तालुक्याने पहिल्यापासूनच ठेवले होते. जिल्ह्यात संसर्ग वाढलेला असतानाही मंडणगडात १० रुग्णांच्या वर रुग्णसंख्या नव्हती. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत केवळ १,३१० सापडले असून १,२४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर केवळ ३४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. मंडणगडात आजही एकअंकी रुग्णसंख्या कायम आहे.