२. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी आता लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी लोकांची धावपळ सुरू झाली आहे. कोणी लस देता का लस, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जण लस कुठे मिळणार, याबाबत दररोज चाौकशी करीत असतात. त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करावा, अशा मागणीचा जोर वाढत आहे.
३. संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी ग्रामपंचायतीत विशेष लसीकरण मोहीम पार पडली. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. गावातील ११० ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कनकाडी गावात कोरोनाविरोधी लस देण्यात आली. दुसरा डोस असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले होते. यावेळी ९६ लोकांना लसीकरणाचा लाभ देण्यात आला.