२. रत्नागिरी शहरात नगरपरिषदेतर्फे कोरोनाचे लसीकरण ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात लसीपासून अनेक जण वंचित आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लस मिळावी, यासाठी मागणी होत आहे. मात्र, आरोग्य विभागाला शासनाकडून जेवढा पुरवठा करण्यात येत आहे. उपलब्धतेनुसार नगरपरिषदेकडून लोकांना लस देण्यात येत आहे.
३. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्र्भाव कमी झालेला असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्त्याचबरोबर शासनाकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत असला तरी लोकांकडून तसेच राजकीय पक्षांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्ष कार्यक्रम घेण्यात मग्न आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यावर पाणी फेरले जात आहे.