२. खाडीपट्ट्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना कोरोना लस वेळेत मिळावी व कोणीही वंचित राहू नये, यासाठी मालघरचे सामाजिक कार्यकर्ते बापू घोले यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषद सदस्य मीनल काणेकर, माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, सुनील जोशी यांच्या माध्यमातून अनेक गरजूंना लस उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांना आरोग्य विभागाकडून सहकार्य करण्यात आले.
२. चिपळूण शहरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग काहीसा मंदावला असून, तूर्तास कोरोना वाढीचा दर स्थिर झाला आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्यविषयक साेयीसुविधा वाढविण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्यापारी, कामगार, ग्राहकांची सरसकट कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या तालुक्यात ७५३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यापैकी ७४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.