२. संपूर्ण कोकणातील व गुहागर तालुक्यातील मुंबई, पुणे व इतर शहरातील चाकरमान्यांची आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन चाचणी न करता त्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नाेकरी, धंद्यानिमित मुंबई, पुणे व इतर शहरातील चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणातील त्यांच्या मूळ गावी येत असतात.
३. रत्नागिरी नगर परिषदेने लसीकरण सुरू केल्यानंतर प्रत्येक वॉर्डमधील नगरसेवक आपआपल्या मतदारसंघातील नागरिकांना लस घेण्यासाठी पुढाकार घेत आहे. नगर परिषदेने आपल्या हद्दीतील नागरिकांचे लसीकरण व्हावे म्हणून पुढाकार घेतला असून, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लसीकरण केले जात आहे. अनेक वेळा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना सर्वसामान्यांची उडणारी तारांबळ, ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी हे सर्व लक्षात घेऊन हे लसीकरण करण्यात येत आहे.