२. रत्नागिरी तालुक्यातील पावस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रुप ग्रामपंचायत गोळपतर्फे जिल्हा परिषद शाळा दाभिळवाडी येथे १८ वर्षांवरील ग्रामस्थांसाठी कोविड लसीचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरणाचा शुभारंभ पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना गावीत यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या लसीकरणाचा ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
३. गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा आबलोली क्रमांक १ येथे ग्रामपंचायत आबलोली व गुहागर पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आबलोली गावाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि वाहतूक करताना पाळावयाचे नियम व वाहतूककोंडी, स्वसंरक्षण, सुरक्षित वाहने चालवणे, मास्कचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर आदि विषयांवर चर्चा झाली.