२. कोरोना महामारीत काम करणाऱ्या योद्ध्यांना सलाम करणारी आगळीवेगळी मिरवणूक रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथे हातिसकर बंधूंनी काढली. पोलीस, पीपीई किट घातलेले वैद्यकीय अधिकारी, नर्सची वेषभूषा करत या मिरवणुकीत गणेशभक्त सहभागी झाले होते. या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करताना तिसरी लाट येऊ दे नको... असे साकडं गणरायाला घालणारा फलकही लावण्यात आला होता.
३. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याभरात एकूण ३,२०२ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले आहे, तर ५,१२१ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहात आहेत. शासनाने कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. शिवाय शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत.