२. गुहागर प्रतिष्ठान हे विरारमध्ये अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवते. कोरोनाकाळात निर्जंतुकीकरण व मास्कचे वाटप, तसेच काही रुग्णांना मदतही करण्यात आली. विरार मनवेलपाडा येथून सुटणाऱ्या व कोकणात येणाऱ्या सुमारे ३० राज्य परिवहनच्या बसेसना निर्जंतुकीकरण केले. त्यानंतर प्रवाशांना त्या बसेसमध्ये बसविले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कदम व पदाधिकाऱ्यांनी याचे नियोजन केले होते..
३. खेड तालुक्यातील लोटे विभागात कोरोनाबाधित रुग्णांनी आतापर्यंत उच्चांक गाठला असून, ही संख्या १,१२१ इतकी झाली आहे. या विभागात आतापर्यंत ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत केवळ एक रुग्ण सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. लोटे विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. तोही आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.