२. कोरोना प्रतिबंधित लसीची पहिला डोस घेऊन १०० हून अधिक दिवस होत आले आहेत तरीही दुसरा डोस मिळण्यास अडचणी येत असल्याने लाभार्थी रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक नागरिक पहिला डोस घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अधिक काळानंतर नगर परिषदेला लस उपलब्ध झाली आहे. अनेक शासकीय लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा होता. मात्र, आता ग्रामीण भागातही जिल्हा परिषदेकडून लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
३. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे-चिंचवणे येेथील ग्रामस्थांच्या २५ जुलै रोजी कोरोना चाचण्या झाल्या. त्यात ६ रुण पॉझिटिव्ह सापडले. परंतु नेवरेत कोविड सेंटर असताना ग्रामकृती दलाच्या अध्यक्षांनी त्या ६ बाधित रुग्णांना नेवरे चिंचवणेतील मराठी प्राथमिक शाळेत राहण्याची सोय केली. नेवरे गावात कोविड सेंटरची स्थापना त्यांनीच केल आणि असे असताना या रुग्णांना प्राथमिक शाळेत कसे काय ठेवले, असा आक्षेप नेवरे चिंचवणे ग्रामस्थांनी ग्रामकृती दलाच्या अध्यक्षांवर घेण्यात आला आहे. या प्रकरणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.