२. दापोली नगरपंचायत लसीकरण केंद्र असलेल्या इमारतीला मंगळवारी कुलूप लावण्याच्या प्रकारामुळे या केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. याप्रकरणी येथील नागरिक सौरभ बोडस यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दापोली नगरपंचायतीचा कोणीही अधिकारी लसीकरण होणार की नाही हे सांगण्यासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या लोकांची प्रचंड गैरसोय झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
३. शासनाने गावोगावी, वाडीवस्तीवर आपली मोहीम राबवून कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनची लस द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. देवरुख तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, शिवाजी चौक, देवरुख स्टॅण्ड, माणिक चौक आणि अनेक ठिकाणी सरसकट आरटीपीसीआर चाचणी शासनामार्फत केली जात आहे. या सर्व चाचण्या थांबवून केंद्र शासन, राज्य शासन यांनी गावोगावी व घरोघरी आपली मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.