२. चिपळूण तालुक्यातील पोसरे येथे कोरोनाबाधित रुग्णांची मोठी संख्या नाेंदविण्यात आली होती. गावातील बहुतांश कुटुंबाची कोरोना चाचणी झाल्याने ८८ बाधित रुग्ण आढळले होते. याबाबत ग्राम कृती दल व आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतल्याने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ग्रामस्थांनी नियम पाळल्याने आता पोसरे गाव कोरोनामुक्त होण्यास मदत झाली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी आरोग्य विभाग आणि ग्राम कृती दल यांचे आभार व्यक्त केले आहे.
३. रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी नुकतीच संगमेश्वर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक, मोहल्ला कमिटी सदस्य, संगमेश्वर व्यापारी, नागरिक, पोलीस पाटील, रिक्षा चालक-मालक सदस्य यांची आगामी बकरी ईद, गणेशोत्सव, कोविड-१९ अनुषंगाने पोलीस ठाणे येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, तरी कोविडमध्ये व्यापाऱ्यांनी नियम पाळून खबरदारी घेण्याचे आवाहन केले.