रत्नागिरी : एकमेकांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना शहरातील सिद्धिविनायक नगरच्या मागील बाजूला गुरुवार, १ एप्रिल रोजी रात्री ८.४५ ते ९.१५ वाजण्याचा सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाेलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. रविकिरण चापोलीकर (४२, रा. सिद्धिविनायक नगर, रत्नागिरी) यांच्यासह प्रशांत साळवी व प्रकाश साळवी (५०, रा. सिद्धिविनायक नगर, रत्नागिरी) यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे. डाॅ. चापोलीकर यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री ते रुग्णालयातून चालत घरी निघाले हाेते. तेव्हा प्रशांतने त्यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत मारहाण केली. तर प्रकाश साळवी यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री डाॅ. चापोलीकर त्यांच्या बाजूने चालत जात असताना प्रकाश यांनी तेथील वॉचमनकडे पाणी आहे का, असे विचारले. त्यावेळी गैरसमजातून चापोलीकर यांनी साळवी यांच्याशी वाद करून त्यांच्यावर दगड फेकून मारला. पुढील तपास हेड काॅन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करीत आहेत.