शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

'किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 7:20 PM

रत्नागिरी : आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या किरीट सोमय्यांवर देशद्रोही म्हणून ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख ...

रत्नागिरी : आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या किरीट सोमय्यांवर देशद्रोही म्हणून ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केली. किरीट साेमय्या यांच्याविराेधात गुरुवारी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयासमाेर शिवसेनेतर्फे आंदाेलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्याविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी मनोगत व्यक्त करताना किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला. सन २०१३मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरु केली. सरकारने असमर्थता दर्शवल्याने किरीट सोमय्या पुढे आले होते. त्यांनी प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबे घेऊन उभे राहिले. ‘आयएनएस विक्रांत’ हा देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी सढळ हस्ते दान केले. या रकमेचं किरीट सोमय्या यांनी काय केलं? ते देशाला समजायला हवं.

ही रक्कम ते भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होते. मात्र, सोमय्या यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे, असे विलास चाळके यांनी सांगितले.यात किरीट सोमय्या यांनी अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्यांच्या बांधकाम व्यवसायाकरिता तसेच निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा आराेपही शिवसेनेने केला आहे. राज्य सरकारने किरीट सोमय्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी चाळके यांनी केली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा महिला समन्वयक शिल्पा सुर्वे, शहर उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुंबकर, शहर महिला संघटक मनीषा बामणे, युवा सेना तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, शहर युवा अधिकारी अभि दुडे व रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाKirit Somaiyaकिरीट सोमय्या