आबलोली : नुकत्याच झालेल्या महापुराने खेड तालुक्यातील पोसरे-बौध्दवाडीतील ६ घरे दरडीखाली गाडली गेली. या दरडीखाली १३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेने पोसरे बौध्दवाडीवर आणि संपूर्ण बौद्ध समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर (गाव व मुंबई) या धम्म संघटनेकडून पोसरे बौद्धवाडीतील १९ कुटुंब (सध्या स्थलांतरित अलोरे येथील शासकीय वसाहत) तसेच मराठा समाजाचे अशोक श्रीपत चव्हाण यांचे एक कुटुंब अशा २० कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे ४०,०००/- रु. तसेच गोवळकोट बौद्धवाडीतील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या ३० कुटुंबांना व पेठमाप बौद्धवाडी येथील ३० कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपयेप्रमाणे ६०,०००/- रु. असे एकूण एक लाख रुपये आर्थिक मदत करण्यात आली, तसेच नित्य उपयोगी कपड्यांचे वाटप करण्यात आले.
नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनीही बुद्ध सासन सभेच्या मदत कार्यात अमूल्य निधीचा हात पुढे दिला आणि मदतीसाठी अनेक हात एकवटले.
भारतीय बुद्ध सासन सभेचे मार्गदर्शक बबन कदम, अनंत मोहिते, दत्ताराम कदम, शिवराम यादव, आनंद कदम, एस. एल. सुर्वे, सुभाष कदम, प्रभाकर सुर्वे, बाळकृष्ण जाधव, मधुकर यादव, चंद्रकांत सुर्वे, काशिनाथ सुर्वे, अमोल मोहिते, दिनेश मोहिते, सिद्धार्थ रणपिसे, विश्वनाथ रणपिसे, विश्वास मोहिते, श्रीधर मोहिते, अनंत जाधव, महादेव रणपिसे, शीलवर्धन कदम, अनिल कदम, उदय कदम, संदीप कदम, मंगेश कदम आदी गाव व मुंबई संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, महिला कार्यकर्त्यांनी, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर गाव मुंबई शाखेच्या सर्व शाखांनी (आबलोली-मुंबई, काजुर्ली गावठाण, काजुर्ली मानवाडी, असोरे, जांभारी, शिवणे, पांगारी-वेळंब, कुडली, आंबेरे येथील स्थानिक गाव व मुंबई शाखांनी) संघटनेकडून व वैयक्तिक मदतीचा हात पुढे दिल्यानेच एक लाख निधी व कपड्यांची मदत पूरग्रस्तांना पोहोचू शकली.
भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी, गोवळकोट बौद्धवाडी, पेठमाप बौद्धवाडी येथे जाऊन दुर्घटना पीडितांना भेटून आर्थिक व कपड्यांची मदत दिली.