शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

एस्टी वर्कशॉपमधील आगीत भंगार जळून खाक २५ हजारांचे नुकसान : आगीच्या संदर्भात संशयाचे धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 9:18 PM

रत्नागिरी : शहरालगतच्या टीआरपी परिसरातील राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या विभागीय कार्यशाळा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत भंगारातील कुशन, सीट कव्हर जळून खाक झाल्या. दीड वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी साडेपाचनंतर आटोक्यात आली. परिसरात धुराचे साम्राज्य परसरले होते.विभागीय कार्यशाळेत एस. टी.च्या गाड्यांची दुरूस्ती केली जाते. वापरात न येणारे साहित्य ...

ठळक मुद्देलिलावादिवशीच आग-भंगाराच्या लिलाव प्रक्रियेदिवशी अचानकपणे आग लागल्यामुळे आश्चर्य विभागिय कार्यशाळेत दहा ते पंधरा लाखाचे भंगार साठवून ठेवण्यात आले होते. लिलावाच्याच दिवशी लागलेल्या आगीमुळे संशयाचा धूर पसरला आहे.

रत्नागिरी : शहरालगतच्या टीआरपी परिसरातील राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या विभागीय कार्यशाळा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत भंगारातील कुशन, सीट कव्हर जळून खाक झाल्या. दीड वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी साडेपाचनंतर आटोक्यात आली. परिसरात धुराचे साम्राज्य परसरले होते.

विभागीय कार्यशाळेत एस. टी.च्या गाड्यांची दुरूस्ती केली जाते. वापरात न येणारे साहित्य याच परिसरात ठेवून नंतर ते भंगारात विकले जाते. दरवर्षी या भंगाराचा लिलाव करण्यात येतो. या भंगाराचा शुक्रवारी लिलाव होणार होता. सुमारे दहा ते पंधरा लाखाचे भंगार साहित्य लिलावासाठी काढण्यात आले होते. हा लिलाव आॅनलाईन सुरू होता. आॅनलाईन लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच दुपारी दीडच्या सुमारास कार्यशाळेच्या बाहेरील गवताला आग लागली.

वाळलेले गवत पेटत पेटत ती आग भंगारापर्यंत पोहोचली. एस. टी.च्या जुन्या सीटचे कव्हर, कुशन पेटले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. याशिवाय एस. टी.च्या पार्टस्मधील अ‍ॅल्युमिनियमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र, अल्युमिनियम वितळवून त्याचा वापर केला जात असल्यामुळे अल्युमिनियमचा लिलाव केला जाणार आहे. आगीचे वृत्त समजताच नगरपालिकेचे बंब मागवण्यात आले. पालिकेच्या चार बंबाव्दारे आग आटोक्यात आणण्याचे काम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होते. बंब आॅपरेट करणाºया नगरपालिका कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने कार्यशाळेतील कर्मचारी आग विझवण्याच्या कामात सक्रिय झाले होते. कुशन व सीट कव्हर पेटल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.अनघा बारटक्के : अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे वितळल्याची माहितीराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कुशन कव्हर, सीटस्मुळे ही आग अधिकच भडकली होती.दुपारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल साडेचार तासाने ही आग आटोक्यात आली.चार बंबाकडून आगीवर नियंत्रणएसटीचे खराब सीट्स, कुशन कव्हर, पत्रे, तसेच प्लास्टिकचे बॅरेल, अ‍ॅल्युमिनिअम असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशमन दलाचे चार बंब आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र या आगीत २५ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती विभायनियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे वितळलेले असले तरी ते वापरात येणार असल्याचे सांगितले.