दापोली : शहरातील ब्रिटिश कालीन पोलीस ठाण्याला आज, शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत स्थानकातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, बरेचसे साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस स्थानकातून अचानक धुराचे लोट येऊ लागले. त्यानंतर दापोली पोलिस ठाण्याच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. हाकेच्या अंतरावर असून देखील नगरपंचायतीचा अग्निशमनचा बंब अर्ध्यातासानंतर घटनास्थळी पोहचला.अग्निशमनचा बंब घटनास्थळी पोहचताच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी दापोली पोलिस कर्मचारी, नागरिकांनी मदत कार्य केले. आगीमध्ये नेमकी किती व कोणत्या प्रकारची हानी झाली आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
Dapoli police station on fire: दापोली पोलीस ठाण्याला आग; आगीचे नेमकं कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 12:07 PM