शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात सहभागी होण्याची विनंती केली; फडणवीसांची माहिती, शिंदेंचा निर्णय काय?
2
देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षावर आले, शिंदेंना सोबत घेऊन राजभवनावर गेले; सत्ता स्थापनेचा दावा केला
3
दोन उत्तरं अन् फडणवीस बनले महाराष्ट्रातले सर्वात 'शक्तिशाली' नेते...! असं जिंकलं पंतप्रधान मोदींचं मन
4
“राज्याच्या विकासाला गती मिळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या निवडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया
5
UAPAमध्ये वाँटेड, ६ वर्षे तुरुंगात; असा आहे नारायणसिंग चौराचा गुन्हेगारी इतिहास
6
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
7
'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन
8
नव्या वर्षात 'हे' IPO येणार; हीरो, HDFC, रिलायन्स सहाय्यक कंपन्यांद्वारे देणार कमाईची संधी
9
महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा
10
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच; खरेदीपूर्वी पाहा सोन्याचे लेटेस्ट दर
12
Vaibhav Suryavanshi च्या भात्यातून आली कडक फिफ्टी! लाँग सिक्सरसह दाखवली ताकद (VIDEO)
13
मार्गशीर्षारंभ: अत्यंत प्रभावी गुरुस्तवन स्तोत्र म्हणा; स्वामींची अपार कृपा मिळवा, शुभ घडेल!
14
IND U19 vs UAE U 19 : वैभवसह आयुष म्हात्रेची फिफ्टी; भारतीय संघाची सेमीत दाबात एन्ट्री
15
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
16
दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा
17
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
18
Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!
19
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?

खेडात कृषी विभागाच्या नर्सरीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 3:40 PM

Fire Ratnagiri- खेड तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधनाने ही आग वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे आंब्याची शेकडो कलमे या आगीपासून बचावली.

ठळक मुद्देखेडात कृषी विभागाच्या नर्सरीला आगआगीपासून बचावली आंब्याची शेकडो कलमे

खेड : तालुक्यातील भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रसंगावधनाने ही आग वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे आंब्याची शेकडो कलमे या आगीपासून बचावली.भरणे मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या नर्सरीला आग लागल्याचे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यावेळी खेडमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या जितेश कोळी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिली. नगराध्यक्ष खेडेकर यांनी तत्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले.नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. कृषी विभागाच्या या नर्सरीत आंबा, काजू, नारळ, चिकू आदींची मोठ्या प्रमाणात रोपे आहेत.

नर्सरीला लागलेल्या आगीच्या धुराने कार्यालयात मार्चअखेर म्हणून सुट्टी असूनही कामकाजात व्यस्त असणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी नर्सरीकडे जाऊन आग विझविण्यासाठी मदत केली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आले नसते तर मात्र कृषी विभागाच्या नर्सरीतील सर्व झाडे जळून खाक झाली असती.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी