दापोली : कोकणातील अनेक समुद्रकिनारी मनमुरादपणे आनंद लुटत पर्यटकांनी 2022 वर्षातल्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी बंधने आली होती. परंतु 2022 च्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत नवीन वर्षाची सुरुवात आनंदमय वातावरणात केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर समुद्रकिना-यावर दाखल झालेल्या पर्यटकांना थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरी करण्याची वेळ आली. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. परंतु दुसऱ्या दिवशी एक जानेवारी रोजी अगदी सकाळीच स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यावर नवीन वर्षाचा मनमुराद आनंद लुटला.2019 ला अलविदा केल्यानंतर 2022 चे सर्वानाच प्रतीक्षा होती तो दिवस आज उजाडला, अन् पहिल्याच दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. कोरोना निर्बंधामुळे समुद्रकिनाऱ्यावर थर्टी फर्स्ट साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली होती.शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने कोकणातील रिसॉर्ट येत्या सोमवार पर्यंत फुल्ल आहेत. मात्र हंगामाच्या तुलनेत पर्यटक तुरळक प्रमाणात दाखल झाल्याने याचा परिणाम स्थानिक व्यवसाय वर झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकांना दिली.
नववर्षाच्या पहिल्या दिवशीच पर्यटकांनी समुद्रकिनारी लुटला मनमुराद आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2022 7:41 PM