रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालय संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या अवघड जागेचं दुखणं या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नेहरु युवा कला दर्शन नाट्यमंडळ रत्नागिरी संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या एक्सपायरी डेट या नाटकाला मिळाले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सतर्फे सादर करण्यात आलेल्या ह्यकाळे बेट लालबत्तीह्ण या नाटकाला प्राप्त झाले आहे.बसणी पंचक्रोशीच्या अवघड जागेचं दुखणं व नेहरु युवा कला दर्शन नाट्यमंडळाने सादर केलेल्या एक्सपायरी डेट या दोन्ही नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ओंकार पाटील (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय पारितोषिक गणेश राऊत (एक्सपायरी डेट) यांना जाहीर झाले आहे. प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक राजेश शिंदे (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (या व्याकुळ संध्या समयी), नेपथ्याचे प्रथम पारितोषिक गजानन पांचाळ (एक्सपायरी डेट), द्वितीय पारितोषिक प्रवीण धुमक (या व्याकुळ संध्या समयी), रंगभूषेचे प्रथम पारितोषिक प्रदीप पेंडणेकर (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय पारितोषिक नितीन मेस्त्री (सगळो गांव बोंबालता), उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक स्वानंद देसाई (अननोन फेस) व तृप्ती राऊत (चाहूल) यांना प्राप्त झाले आहे.अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र ऋचा मुकादम (अवघड जागेचं दुखणं), अर्चना पेणकर (एक्सपायरी डेट), तनया आरोळकर (मी स्वामी या देवाचा), भावना रहाटे (आता उठवू सारे रान), पूजा जोशी (धुआँ), अनंत वैद्य (काळे बेट लाल बत्ती), सुशांत पवार (दि ग्रेट एक्सचेंज), शरद सावंत (चाहूल), जयप्रकाश पाखरे (एक्सपायरी डेट), योगेश हातखंबकर (फेरा) यांना जाहीर झाले आहे.बसणी पंचक्रोशी संस्थेतर्फे गेली पाच वर्षे सादर करण्यात आलेल्या नाटकाने प्राथमिक फेरीत अंतिम क्रमांक पटकविला आहे. प्यादी, मेन विदाऊट शॅडोज्, मन वैशाखी डोळे, श्रावणी कॅप्टन, कॅप्टन, कॉफीन या नाटकाने सलग पाच वर्षे अंतिम स्पर्धेतील प्रथम क्रमांक संपादन केला. यावर्षी देखील षटकार ठोकून अवघड जागेचं दुखणं प्रथम क्रमांक मिळविला आहे. अंतिम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी जोरदार सराव करणार असल्याचे दिग्दर्शक ओंकार पाटील यांनी ह्यलोकमतशीह्ण बोलताना सांगितले.
राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम-- बसणी पंचक्रोशीचा षटकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:37 PM
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण ...
ठळक मुद्दे- नेहरू युवा कला दर्शन नाट्यमंडळाचे एक्सपायरी डेट द्वितीय- बाबा वर्दम थिएटर्सचे काळे बेट लालबत्ती तृतीय