अरुण आडिवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य प्रशासकीय सोहळ्यात आजवर शहरी भागातील मुले-मुलीच सहभागी होत होती. आता प्रथमच ग्रामीण मुलींचे पथक संचलन करणार आहे. हे मुलींचे पथक त्यासाठी गेले चार महिने सराव करत आहे. हातखंबासारख्या ग्रामीण भागातील अ. आ. देसाई विद्यालयाच्या मुली आपले कौशल्य दाखविणार आहेत.रत्नागिरीतील सोहळ्यात पोलीस, होमगार्ड, एनसीसी, एमसीसी, स्काऊट-गाईड यांच्यासह विविध पथकांचे संचलन होते. या संचलनात यावर्षी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर व श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेज, हातखंबा येथील गाईड पथकाला परेडची संधी मिळाली आहे.रत्नागिरी भारत स्काऊट-गाईड जिल्हा संस्थेच्या प्रयत्नातून हातखंबासारख्या ग्रामीण भागातील विद्यालय सहभागी होणार आहे. येथील ३३ मुलींचे पथक गेले ३ महिने शिक्षक सैफुद्दिन हुसेन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर, विद्यालयाचे शिक्षक जे. एस. पाटील, भीमसिंग गावीत, केरबा कुराडे यांचेही या पथकाला मार्गदर्शन मिळत आहे. या पथकाचे प्रतिनिधित्व साक्षी गौतडे, पूर्वा भुते व वेदिका सनगरे या करत आहेत. गाईडच्या गणवेशाकरिता हाजी इब्राहीम मुकादम, भास्कर देसाई, संतोष झोरे यांनी मदत केली आहे.
सकाळीच घर सोडतातया संचलनात ३३ मुलींचा सहभाग आहे. बहुतांश मुली ग्रामीण भागातील राहणाºया आहेत. त्यामुळे सकाळी ५.१५ वाजताच त्या घरातून बाहेर पडतात. शाळेतून या मुलींना रत्नागिरीत खासगी गाडीने आणले जाते. सकाळी सराव करून पुन्हा या मुली शाळेत येतात. ११ ते ५ शाळा करून या सायंकाळी घरी जातात.
माझे घर डफळचोळवाडी येथे आहे. संचलनाच्या सरावासाठी मी सकाळीच घरातून बाहेर पडते. संचलनात सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याने त्याचा अभिमान वाटतो. पहिल्यांदाच संचलन करणार असल्याने थोडी भीतीही आहे. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर मिळालेल्या संधीचे आम्ही नक्कीच सोनं करू.- साक्षी गौतडे, प्रथम लीडरग्रामीण भागातील मुलीसंचलनात सहभागी होणाºया या मुली ग्रामीण भागात राहणाºया आहेत. संचलनात झरेवाडीतील ५, डफळचोळवाडी ५, भोके येथील २, चरवेलीतील २, पानवलमधील २ आणि हातखंब्यातील १७ मुलींचा समावेश आहे. या सर्व मुलींची शाळेकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
संचलनात सहभागी होता येणार असल्याने खूप आनंद झाला आहे. हातखंबा - भुतेवाडी येथून मी नेहमी सकाळी सरावासाठी येते. आम्ही सर्वजण सकाळी निघतानाच डबा घेऊन येतो. शहरात होणाºया संचलनात आम्ही प्रथमच सहभागी होणार असल्याने थोडे दडपणही आले आहे. तरीही आम्ही चांगले करून दाखवू.- पूर्वा भुते, द्वितीय लीडरआमच्या शाळेला संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्याचा निश्चितच अभिमान आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच गाईडच्या माध्यमातून संचलनात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.- हुसेन पठाण, मुख्याध्यापकसंचलनासाठी गेल्या चार महिन्यांपासून सराव सुरू आहे. या मुलींनी गाईडचे प्रशिक्षण घेतलेले आहे. पण त्यांना संचलनाची इतकीशी माहिती नव्हती. त्यामुळे शुन्यातूनच सारे काही निर्माण करण्यात आले आहे.- सैफुद्दिन पठाण, गाईड शिक्षकमी पानवल - होरंबेवाडी येथे राहाते. गाईडच्या माध्यमातून आमच्या शाळेला प्रथमच ही संधी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. सगळ्यांसमोर संचलन करण्याचा अनुभव वेगळाच असेल. त्यामुळे संचलनाबाबत उत्सुकता आहे. भीती वाटत असली तरी सरावामुळे काही वाटत नाही.- वेदिका होरंबे, तृतीय लीडर