अजून एक खेळादरम्यान, खेळाआधी आपले कोच किंवा सवंगडी प्रेरणादायी वक्तव्य ठरतात. तेव्हा आपल्या शरीरातील एन्डॉरफिन्स वाढवतात. ती आपल्यात जिद्द निर्माण करतात. इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षेला, आपल्या खेळीच्या दर्जाला उंचावतात, म्हणून प्रेरणादायी वक्तव्य आवश्यकच असतं. माझ्यामते त्याची जिंकण्याची भारावलेली प्रेरणा हे एक ‘अत्युच्च खाद्य’ आहे. अलीकडेच इंग्लंड आणि भारताच्या कसोटीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी ‘तुझा सहज खेळ खेळ’ असे कप्तानाने सांगितले. आपल्या फलंदाजाला, तो क्षण भारावलेला होता. साहजिकच हातातून गेलेला सामना जिंकता आला.
त्याच वेळी प्रतिस्पर्धाचे खोचक वक्तव्य, चिडवणारे हावभाव, प्रेक्षकांची चेष्टा इत्यादीमुळे क्रिएटीनसारखं घातक रसायन शरीरात तयार होतं. ते स्पर्धकाला नाऊमेद करतं. अशा वेळी स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवणारा अजून आपल्या खेळ किंवा सरावात चमक दाखवितो. उत्तम नैसर्गिक आहार या सर्व गोष्टी बहाल करतो. खेळाडूंच्या जीवनात अजून एका गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे, ते नियमित आराम. तेही स्नायूंचं, मेंंदूचं एक खाद्य आहे. आपले तज्ज्ञ कोच याबाबत नक्कीच काळजी घेतात. याचा परिणाम नक्कीच दुसऱ्या दिवशीच्या खेळात दिसून येतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती खेळाडूंनी जपावी, ती म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान, यापासून दूर राहावे. याचे खेळाडूंच्या उत्तम खेळासाठी (PERFORMANCE) अनन्य साधारण महत्त्व आहे.
(पुढील लेख खेळाडूंच्या इजा (स्पोर्टस इन्ज्युरीज्)
(क्रमश:)
- डाॅ.दिलीप पाखरे