रत्नागिरी : अमरावती ते वीर दरम्यान दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अनारक्षित विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दरम्यान कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून वीर स्थानकापर्यंत धावणारी ही पहिलीच विशेष गाडी आहे.या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नवीन अमरावती येथून ही विशेष गाडी (०११०१) दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील वीर स्थानकात ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७:४५ वाजता पोहोचेल.ही अनारक्षित गाडी परतीच्या प्रवासाला दिनांक ११ फेब्रुवारी रोजी निघणार आहे. वीर ते नवीन अमरावती मार्गावर धावताना ही गाडी (०११०२) वीर येथून रात्री १० वाजता निघेल आणि १२ फेब्रुवारी २५ रोजी ती नवीन अमरावतीला दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. जनरल श्रेणीचे १६ आणि एसएलआर २ अशी एकूण १८ डब्यांची ही गाडी धावणार आहे.
विशेष गाडीचे थांबेबडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नंदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा.