शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

"तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र, मला..."; उद्धव ठाकरेंचा तातडीने राजन साळवींना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 2:15 PM

आमदार राजन साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल साडेतीन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी, तसेच त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम या तिघांविरुद्ध आज सकाळी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, या विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.

जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ आमदार साळवी यांची चौकशी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सुरू आहे. यात त्यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम, त्यांचे भाऊ दीपक तसेच पुतण्या अथर्व याचीही चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्यात आली आहे. चालू महिन्यातच सर्वांचे जबाब नोंदवण्याचे काम संपले आहे. आमदार साळवी तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानंतर आता गुरुवार १८ रोजी सकाळी ९:०८ वाजता आमदार राजन साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीच्या कारवाईवर राजन साळवींची प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत हे जनतेला माहिती आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. हे अधिकारी कालच रत्नागिरीत दाखल झाले होते. मी तुरुंगात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे साळवी म्हणआले. तसेच चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे, असे राजन साळवी म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. राजन तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, आमदार राजन साळवी, अनुजा साळवी, शुभम साळवी (सर्व रा. साहेब बंगला, एमएसईबी ऑफिसच्या बाजूला, खालची आळी, रत्नागिरी) यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते ०२ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये असलेले ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येऊन, त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण ३,५३,८९,७५२/- रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच ११८.९६ % अपसंपदा संपदित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे व त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर केला नाही. या प्रकरणाची सर्व कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल येरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग