शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

हिंमतगड किल्ल्यावरील तटबंदी सदृढीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:32 AM

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा ...

फोटो ओळी- किल्ले हिंमतगड येथे सुरू असलेली विकासकामे, किल्ल्यावरील कामासाठी टाकण्यात आलेली पुळण व मूळ स्वरूपात बाधा आणणारी टाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बाणकोट येथील हिंमतगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू असलेले तटबंदी सदृढीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. किल्ल्याची डागडुजी करत असताना पुरातत्व खात्याने यासंदर्भात संशोधन शास्त्राचे आधारे संकलित केलेली माहिती प्रकाशित करत ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूपास अजिबात धक्का पोहाेचू न देण्याची मागणी तालुक्यातील इतिहासप्रेमींमधून केली जात आहे. राज्याचे सांस्कृतिक खात्याचे माध्यमातून किल्याचे रूपडे पालटण्याचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे.

इतिहासाच्या पुस्तकांत हिंमतगड किल्ल्याचा संदर्भ वारंवार सापडत आहे. पुरातत्व खात्याने संशोधन करून मिळविलेली भूतकाळातील माहिती नवीन पिढीसमोर आणण्याची आवश्यकता इतिहासप्रेमींमधून व्यक्त हाेत आहे. सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या हिंमतगड किल्ल्याची दुरुस्ती करताना ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वारसास्थळांचे संरक्षण करताना आवश्यक असलेल्या खबरदारीमध्ये वारशाच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल होता कामा नये याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी कोणाचीही मान्यता नसताना अगदी प्रवेशद्वारासमोर पाण्याची टाकी उभी करून विद्रुपीकरण कोणी केले. या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही प्रवेशद्वाराला लागूनच पाण्याची टाकी उभी केल्याने आज मुख्यद्वारासमोरेचे किल्ल्याचे छायाचित्र इंटरनेटवरही उपलब्ध नाही. कारण नव्याने बांधलेली पाण्याची टाकी हे आहे, यासंदर्भात स्थानिक माध्यमे व इतिहासप्रेमींना सातत्याने प्रश्न विचारूनही पाण्याची टाकी त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलवण्याची तसदी संबंधितांनी घेतलेली नाही.

गेल्या वर्षभरापासून किल्ल्याची तटबंदी व आतील घरटी मजबूत करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेले बुरूज या मजबूत करण्याचे काम ठेकेदारास देण्यात आला. तटबंदीच्या कामात चक्क पुळण (समुद्रकिनारी असलेली वाळू) वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून केला जात आहे. या कामाचे सातत्य व गुणवत्ता याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. पूर्ण तटंबदीच्या बाजूने बाहेरील बाजूने जुन्या पायवाटा रद्द करून चिऱ्याची भिंत तटबंदीस आधार देण्याकरिता उभी करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ स्वरूपात मोठे बदल झाले आहेत व हे बदल मूळ स्वरूपाचे भाग बनून गेल्यासाखेच वाटत आहेत. किल्ल्यासंदर्भातील संशोधनाचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नसल्यास मूळ स्वरूपातील छेडाछेडाचा हा प्रकार फारच गंभीर आहे. तीन वर्षांपूर्वी किल्ल्याच्या पायथ्याशी तोफ आढळली असल्याने जमिनीच्या पोटात भूतकाळातील अजूनही काही गुपिते लपून असण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या शंका व चिंतांचे निरसन पुरातत्व खात्याने करण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सार्वजनिक पातळीवर शासन व प्रशासनाने हाती घेतलेले विकासाचे उपक्रम येथील पर्यटन वाढीसाठी प्रेरक ठरणारे आहेत, हे खरे असले तरी किल्ल्यावर मानवी वस्ती नाही. त्यामुळे असामाजिक तथ्यांचे केंद्र बनलेला किल्ले हिंमतगड गुप्त धनाचे साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी येथे भूतकाळात बेकायदेशीर मार्गाने खोदाकामही झाले आहे. किल्ल्याच्या परिसरास लागून बाणकोट बागमांडला पुलाचे काम सुरू असल्याने येथे सुरुंग स्फोट व रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डबर या गौणखनिजाचे उत्खननही झाले आहे. याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे.