रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार बरसण्यास सुरूवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेने पावसाने आॅगस्टची सरासरी दुप्पटीने ओलांडली असून, गतवर्षीच्या सरासरीपेक्षा १००० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. येत्या ३ आॅगस्टपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह््यात उघडीप घेतली होती. शुक्रवारपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. सायंकाळनंतर तर पावसाचा जोर अधिक वाढलेला असतो. काल शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस संततधारेने सकाळपर्यंत जोरदार पडत होता. शनिवारी पावसाचे वातावरण कायम होते. जिल्ह्यात ३० रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकूण ३७४ मिलिमीटर (सरासरी ४१.५६ मिलिमीटर) पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद गुहागरात ७३ मिलिमीटर इतकी झाली आहे. १ जून ते ३० जुलैपर्यंत २४१३ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षीची या कालावधीतील नोंद १४०८ मिलिमीटर इतकी झाली आहे. गतवर्षीच्या सप्टेंबरची सरासरीही (२१८२ मिलिमीटर) पावसाने आत्ताच ओलांडली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह््यात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा
By admin | Published: July 31, 2016 12:37 AM