वाटुळ, दि. १२ : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाटुळ व मंदरुळमधील ५६७ भू धारकांची जमिन प्रांत कार्यालयाकडून संपादीत झाली आहे. १४ व १५ जुलै रोजी राजापूरचे प्रांत अभय करंगुटकर यांच्या उपस्थिीतीत वाटुळ ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शेतकºयांसह प्रत्यक्ष भेट घेत प्रांत कार्यालयाकडून वाटुळमधील १८० खातेधारकांच्या व मंदरुळ येथील ८१ खातेधारकांना जमिन मोबदला बाजारभावाच्या चारपटीने देण्याचे ठरले होते. या कामासाठी वाटुळमध्ये १२ कोटी ९९ लाख १ हजार ८१७ तर मंदरुळ येथील शेतकरºयांना २ कोटी ९८ लाख ६१ हजार १२८ रुपये थेट भूधारकांच्या खात्यात ४ सप्टेंबरपर्यंत जमा होतील असे आश्वासन प्रांत कार्यालयाकडून देण्यात आले होते.
आॅक्टोबर महिन्यातील दुसरा आठवडा उलटला तरीही संबंधित खातेधारकांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने वाटुळ व मंदरुळ परिसरातील भू धारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रांत कार्यालयाकडून ४ सप्टेंबर रोजी खात्यात पैसे जमा होणार असल्याची ग्वाही मिळाल्याने व खात्यात जमा होणारी रक्कम लाखोच्या घरात असल्याने अनेक शेतकºयांनी जमीन, फ्लॅट व इतर ठिकाणी पैसे गुंतवले.
काहींनी सप्टेंबर महिन्यात आगाऊ तारखेचे चेकस् दिलेले आहेत. ठरलेल्या मुदतीत चेक न वटल्याने अनेकांना प्रचंड मनस्ताप व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.प्रांत कार्यालयात संबंधित जमिन मालकांनी पाठपुरावा केला असता संपादीत जमिनीबद्दल तक्रारी आल्याने खात्यात पैसे जमा केलेल नसल्याचा खुलासा संबंधित अधिकाºयांकडून करण्यात आला. परंतु वाटुळ तांबळवाडी येथील शेतकºयांनी झालेल्या तक्रारीचा आपसात निपटारा करुन तसे प्रांत कार्यालयाला कळवूनदेखील पैसे मिळत नसल्याचे तांबळवाडी येथील भू धारक बाळकृ ष्ण (बावा) चव्हाण यांनी सांगितले.
शासनाकडून दिलेल्या तारखेला पैसे मिळण्याची हमी असल्याने मिळणाºया आगाऊ रकमेच्या भरवशावर मोठे व्यवहार केलेल्या शेतकºयांना खूप मोठी अडचण झाली असून जिथे काहीच तक्रारी नाहीत, अशा खातेधारकांची रक्कम प्रांत कार्यालयाकडून खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी बाळकृष्ण चव्हाण यांनी केली आहे.सात-बाºयावर अनेकांची नावे आहेत. त्याची योग्यवेळी फोड न झाल्याने तक्रारी होणे साहजिकच आहे. परंतु अनेक ठिकाणी काडीचाही संबंध नसलेल्या व्यक्तीकडून खोट्या तक्रारी दाखल आहेत. अशा तक्रारीचा निपटाराही झालेला आहे. असे असताना राजापूर प्रांत कार्यालयाकडून जमिन संपादीत झाल्यानंतर आता शेतकºयांना वाºयावर सोडल्याची भावना झाली आहे.
करोडो रुपये महिना उलटला तरीही खात्यात जमा झालेले नाहीत. लोकांना कर्जावरील व्याज भरावे लागत आहे. शेतकºयांच्या भावना तीव्र आहेत. जमिन संपादीत करतानाची अधिकाºयांची भाषा व हक्काच्या पैशासाठी प्रांत कार्यालयात चकरा मारताना अधिकारी वर्गाकडून मिळणारी वागणूक कमालीची चिड आणणारी आहे. तक्रारी नसतील त्या शेतकºयांना लागलीच मोबदला मिळावा.- बाळकृष्ण मुरारी चव्हाण, तांबळवाडी, वाटुळ (भूधारक)