रत्नागिरी : परराज्यातील आंबा कोकणचा हापूस सांगून विक्री सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हापूसच्या नावाखाली अन्य आंब्याची विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
विविध कंपन्यांचे वाफारे बाजारात
खेड : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी लोकांकडून काढा घेणे, गरम वाफा घेण्यात येत आहे. म्हणून जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या वाफाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
वाढत्या उष्म्यामुळे हैराण
रत्नागिरी : सततच्या वातावरणातील बदलामुळे उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे शीतपेयांचा खप वाढला आहे. थंड पदार्थ सेवनामुळे सर्दी व तापसरी बळावण्याची शक्यता आहे.
फूल व्यवसाय धोक्यात
राजापूर : लग्नसराईमुळे फुलांचा खप चांगला होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने तसेच कार्यक्रम, मेळावे यांच्यावरही बंदी असल्याने फुलांची विक्री होत नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अशीच परिस्थती राहिली तर हा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.
ग्राम कृती समित्यांची स्थापना
देवरुख : ग्रामस्तरावर कृषी क्षेत्राचे नियोजन करण्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी कोकणातील सर्व ग्रामपंचायतींत प्रथमच ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीमध्ये गावातील प्रगतीशील शेतकरी, लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.