खेड : लसीकरणाच्या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमध्ये मोफत रिक्षासेवा दिली जात आहे. शहरातील नगर परिषद दवाखान्यामध्ये नागरिकांना कोरोना लस (व्हॅक्सिन) देण्यात येत आहे. तेथे लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची ने - आण करण्यासाठी मोफत रिक्षासेवा दिली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी उपनगराध्यक्ष रंगाशेठ माने यांच्या हस्ते करण्यात आली.
सदर वेळी उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, तालुका अध्यक्ष व नगरसेवक शरद शिर्के, विभाग अध्यक्ष सागर कवळे, मनविसे खेड शहर उपाध्यक्ष सिद्धेश साळवी, डाॅ. विक्रांत पाटील, रहिम सहिबोले, दादू नांदगावकर, सिद्धेश साळवी, राहुल पाटणे, विभाग अध्यक्ष हर्ष गांधी, संतोष पवार, विजय खेडेकर, प्रदीप भोसले, उदय गुडेकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
......................
खेडमध्ये लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोफत रिक्षासेवा देण्याच्या उपक्रमाची सुरुवात माजी उपनगराध्यक्ष रंगाशेठ माने यांच्या हस्ते करण्यात आली.